शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) बाबत, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी SQAAF वर आधारित १८ व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. सदरील सर्व व्हिडिओ SCERT च्या maa.ac.in या वेबसाईटवर SQAAF या सबटॅबवर देण्यात आलेले आहेत. सदरील व्हिडिओ व SQAAF- शासन निर्णय, परिपत्रके,सूचना आणि मार्गदर्शन पुस्तिका,संदर्भ साहित्य खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे .
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळविण्यासाठीच्या अर्जाचा नमुना
प्रस्तावना
माहितीचा अधिकार अधिनियम - २००५ या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासकीय / निमशासकीय यंत्रणांवर चांगले नियंत्रण आले आहे. तसेच या कायद्यामुळे शासकीय कामकाज कसे होत आहे, शासनाच्या जनकल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, त्यातील विविध स्तरावरील टप्पे / प्रक्रिया याचीही माहिती सर्व सामान्य जनतेला खुली होणार आहे. तसेच शासनाचा कारभार जसजसा पारदर्शक होत जाईल तसतशी जनतेच्या मनातील संदिग्धता कमी होत जाईल. तसेच दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार यालाही आपोआपच आळा बसेल.
:- आमचे नवोपक्रम :-
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वासी
दिनांक 22 डिसेंबर 2024 ला झालेल्या एन एम एम एस(NMMS) परीक्षेत ,पंचायत समिती , समुद्रपूर अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वासी येथील विद्यार्थिनी कु. धनश्री झाडे, कु. साक्षी तळवेकर , कु.नंदिनी वागदे या पास झालेल्या आहेत. या सर्व विद्यार्थिनीचे व मार्गदर्शक शिक्षिका सौ. शितल पाटील मॅडम यांचे शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐💐💐💐💐